तफावत
Artical 15 चा हा पहिलाच ब्लाॅग आहे. तर काही चुकले तर क्षमस्व!
आपण वर्ष 2019 मध्ये जगत आहोत. निवडणूका तोंडावर आल्याने काही वादग्रस्त विधाने मी करणार नाही. असो, तर आजचा माझा विषय आहे तफावत. तर मित्रहो आजच्या काळात जास्त निदर्शनास येणारी गोष्ट हीच आहे की आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला तफावत जाणवते आहे. हा मग ती विचारांमध्ये असो वा माणसाच्या बोलण्यामध्ये. खर तर वास्तविकतेच भान न राखता केलेल्या गोष्टींमुळे किंवा घेतलेल्या निर्णयांमुळे ही तफावत आढळून येते. आता काहींना तफावत म्हणजे नक्की काय तेच समजल नसेल तर ते देखील मी स्पष्ट करून सांगतो. * तफावत म्हणजे दोन गोष्टींमधला वेगळेपणा. मग तो विचारांमध्ये असो वा निर्णयांमध्ये. पण सध्या ही तफावत जास्त माणसांत दिसून येतेय. काही माणस जे बोलतात तसे वागत नाहीत आणि जस त्यांना वागायच असत तर ती गोष्ट ते बोलूनच दाखवत नाहीत. आज आम्ही एवढे मोठे नक्कीच झालोय की स्वतःचे निर्णय स्वतः घेतो पण एक प्रश्न असाही पडतो की जर आपण खरच मोठे झालोच आहोत तर मग समोरच्या व्यक्ती सोबत बोलताना मनात त्याच्या बद्दल वाईट हेतूच का ठेवावा. काही माणस तोंडावर चांगल बोलतात पण आपली पाठ फिरली की वाईट बोलतात. मग ही बोलण्यातली तफावत का असावी. आज आम्ही इंजिनिअर होतो, डाॅक्टर होतो पण एक चांगला माणूस किंवा एक चांगला नागरिक होऊ शकत नाही. अस का? आम्ही सांगताना मोठेपणाने सांगतो की भारत माझा देश आहे. पण जेव्हा एखाद्याला सैनिक होशील का अस विचारल तर 60% मुल नाही म्हणून मोकळी होतात. मग तुमच्या बोलण्यातली आणि वागण्यातली ही तफावत कधी नाहीशी होणार? की आमच्या दिवंगत राष्ट्रपती मा.श्री. ए.पी.जे.अब्दुल कलामांच 2020 ला भारत महासत्ता करायच स्वप्न अपूरच राहणार? विचार करा........
उठा......
संघटीत व्हा.......
दूर करा ही तफावत.............
जय हिंद.....
जय महाराष्ट्र......
*पुढील ब्लाॅग दि. 20/10/2019 ला येईल.
Artical 15
एक आवाज देशासाठी.

Comments
Post a Comment